‘या’ आठवड्यात 5 नवे स्मार्टफोन लाँच, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 5:10 PM

या आठवड्यात Samsung Galaxy M32 5G, Realme C21Y, Motorola Edge 2021, Vivo Y21 हे स्मार्टफोन्स बाजारात दाखल झाले आहेत.

Aug 29, 2021 | 5:10 PM
Realme C21Y हा फोन नुकताच भारतात लाँच करण्यात आला आहे. Realme C21Y हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिम कार्ड आणि 4G VoLTE सह येतो. यात अँड्रॉइड 10 आधारित Realme यूआय सॉफ्टवेअर देखील आहे. Realme आधीच अधिकाधिक स्मार्टफोनमध्ये Android 11 देत आहे. फोनमध्ये Octa core Unisoc T610 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 4 जीबी LPDDR4x रॅम आहे, जो 64 जीबी स्टोरेजसह येतो. त्याचबरोबर स्टोरेज वाढवण्यासाठी त्यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे. रियलमी C21Y मध्ये 6.5-इंचांचा HD + डिस्प्ले आहे जो Teardrop Notch सह येतो. फोनमध्ये 88.7 टक्के पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

1 / 6
या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा आहे. नॉचमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.रियलमी C21Y ची किंमत 8,999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याचबरोबर 9,999 रुपयांमध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळते. हा फोन क्रॉस ब्लू आणि क्रॉल ब्लॅक रंगात येतो. फोनचा पहिला सेल 30 ऑगस्टला फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होईल.

2 / 6
Oukitel WP15 रग्ड फोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. Oukitel WP15 $ 299.99 मध्ये येतो, भारतात याची किंमत अंदाजे 22,250 रुपये आहे. स्मार्टफोनच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 16.5 x 720 पिक्सलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.52-इंच HD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 700 SoC, 8GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेज, 256GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेज सपोर्ट, 18W फास्ट-चार्जिंगसह 15,600mAh बॅटरी देण्यात आली आहे.

3 / 6
Samsung Galaxy M32 5G या आठवड्यात भारतात लॉन्च करण्यात आला आहे. 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज स्पेस असलेल्या या फोनच्या बेस मॉडेलसाठी 20,999 रुपये मोजावे लागतील.  सॅमसंग गॅलेक्सी M32 5G च्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 6.5-इंच TFT Infinity-V HD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 720 SoC, 6GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेज, 48MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

4 / 6
Motorola Edge 2021 या आठवड्यात जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे. मोटोरोला एज 2021 ची सुरुवातीची किंमत $ 500 आहे, जी अंदाजे 37,000 रुपये आहे. इंट्रोडक्टरी ऑफर संपल्यानंतर, स्मार्टफोनची किंमत $ 700 असेल, जी अंदाजे 52,000 रुपये इतकी असेल. स्मार्टफोनच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये स्नॅपड्रॅगन 778 जी चिपसेट, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज, 6.7-इंच एलसीडी डिस्प्ले, 5,000 एमएएच बॅटरी, 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि बरेच काही समाविष्ट आहे.

5 / 6
Vivo ने गेल्या आठवड्यात नवीन 5G स्मार्टफोन Y21 (Vivo Y21) लाँच केला आहे. जो आता ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवर 15,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोन 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजसह येतो (इंटर्नल स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येईल). यामध्ये एक्सटेंडेड रॅम 2.0 देखील ऑफर करण्यात आला आहे, जो 1GB इनॅक्टिव्ह रॉम आहे. दरम्यान, कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, या फोनचं 4 जीबी + 64 जीबी व्हेरिएंट लवकरच उपलब्ध होईल. स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचांचा एचडी प्लस हेलो फुल व्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, जो इमर्सिव व्ह्यूइंग एक्सपीरियन्ससाठी इन-सेल टेक्नोलॉजीसह येतो. 18W फास्ट चार्ज क्षमतेसह हा स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी प्रदान करतो.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI