Marathi News » Utility news » Work from home may affect your salary in future know how google is paying
… मग आता ‘वर्क फ्रॉम होम’मुळे तुमच्या पगारावरही परिणाम होणार?
कोरोना साथीरोगामुळे कामाची पद्धतच बदलली आहे. कार्यालयात येऊन काम करण्याऐवजी जिथं राहता तेथूनच म्हणजे वर्क फ्रॉम होमचा नवा बदल झालाय. त्यामुळे आता कंपन्या देखील कार्यालयांवर आणि व्यवस्थांवर मोठा खर्च करण्याऐवजी वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत आहेत.

1 / 5
आता अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होमचा फायदा लक्षात घेता त्याकडे कायम स्वरुपीचा पर्याय म्हणूनही पाहात आहेत. म्हणूनच ऑफिस वर्किंग कल्चर कायमचं वर्क फ्रॉम होण्याची शक्यता बळावलीय. Google ने मंगळवारी (22 जून) एक प्लॅटफॉर्म लाँच केलाय. यानुसार कर्मचाऱ्यांना ते कोणत्या शहरात राहतात, तेथे किती खर्च आहे आणि किती वेतन याचा विचार करुन अंतिम वेतन निश्चित होणार आहे.
2 / 5
गूगल 9 नोव्हेंबरपासून करणार मोठा बदल
3 / 5
Google जगभरात 1 लाख 40 हजार 000 लोकांना रोजगार देते. येथे कोरोना साथीनंतर नव्या कामाच्या पद्धतीने 60 टक्के कर्मचारी आठवड्यात काही दिवसच ऑफिसमध्ये येतील आणि 20 टक्के कर्मचारी नव्या कार्यालयात येतील. उर्वरित 20 टक्के गुगल कर्मचारी घरातूनच काम करणार आहेत.
4 / 5
नव्या वर्क लोकेशन टूलमुळे गुगल कर्मचाऱ्यांना ते राहत असलेलं ठिकाण आणि तेथील खर्च याचा विचार करुन पगार देणार आहे. Google चे मुख्य कार्यकारी सुंदर पिचाई यांनीही रिमोट लोकेशन वर्क आणि ठिकाणातील बदल यात लवचिकता आवश्यक असल्याचं म्हटलंय.