36 जिल्हे 72 बातम्या | 1 August 2021

| Updated on: Aug 01, 2021 | 9:43 AM

जुलैअखेर बारावीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्यामुळे ऑगस्ट महिना उजाडला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Follow us on

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता (HSC Result 2021) वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या (सोमवार दोन ऑगस्ट) लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाकडून दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती समोर आली होती. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. जुलैअखेर बारावीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्यामुळे ऑगस्ट महिना उजाडला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली आहे.