4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 24 October 2021

| Updated on: Oct 24, 2021 | 8:31 AM

यावेळी विश्वचषकातील टी-20 सामना अटीतटीचा होईल, असं म्हटलं जात आहे. कारण दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघांचे अनेक खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. पाकिस्तानी संघातील अनेक फलंदाज सध्या खोऱ्याने धावा काढत आहेत. पाकिस्तान संघाचं असं चित्र भारताविरुद्धच्या मागील 2-3 सामन्यांमध्ये पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळेच पाकिस्तानला नेहमी पराभवाला सामोरे जावे लागले.

Follow us on

भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी T20 विश्वचषकात आमनेसामने येतील. प्रत्येक वेळी भारत आणि पाकिस्तानच्या वर्ल्डकप सामन्यांमध्ये मोठा थरार पाहायला मिळतो. या स्पर्धेत पाकिस्तान भारताला पराभूत करू शकेल का? असा सवाल पाकिस्तानी चाहत्यांना पडला आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तान याबाबतीत अपयशी ठरत आहे.

पण यावेळी विश्वचषकातील टी-20 सामना अटीतटीचा होईल, असं म्हटलं जात आहे. कारण दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही संघांचे अनेक खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. पाकिस्तानी संघातील अनेक फलंदाज सध्या खोऱ्याने धावा काढत आहेत. पाकिस्तान संघाचं असं चित्र भारताविरुद्धच्या मागील 2-3 सामन्यांमध्ये पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळेच पाकिस्तानला नेहमी पराभवाला सामोरे जावे लागले.

पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत टी-20 फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी क्रमवारीत बराच काळ पहिल्या क्रमांकावर राहिला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील या फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट टायमिंग आणि फॉर्ममध्ये दिसतोय.