VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 May 2022

| Updated on: May 29, 2022 | 1:29 PM

संजय राऊत आणि अनिल परब काय बोलतात याला आता काही महत्त्व नाही. शिवसेनेनेच मुंबई महापालिकेचं गटार केलं आहे. ईडी ग्रामपंचायतीत गेली. 4 तास त्यांनी तपास केला. त्यांच्या हाती अनिल परब यांचं 26 जून 2019चं पत्रं लागलं आहे. त्यातून सर्व काही उघड होणार आहे. त्यामुळे आता खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही, असं सोमय्या म्हणाले.

Follow us on

जून 2019 रोजी तुम्ही दापोली ग्रामपंचायतीला पत्रं लिहून 16,800 स्क्वेअर फूटाचे साई रिसॉर्ट तुमच्या मालकीचे आहे म्हणून सांगितलं. आता तुम्ही मीडियाला सांगत आहात की, तुमचा साई रिसॉर्टशी काही संबंध नाही. मग हा रिसॉर्ट नक्की कुणाच्या मालकीचा आहे? अनिल परब जवाब दो, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसैनिकांना वाटतं की ईडी गटारीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी गेली होती. संजय राऊत आणि अनिल परब काय बोलतात याला आता काही महत्त्व नाही. शिवसेनेनेच मुंबई महापालिकेचं गटार केलं आहे. ईडी ग्रामपंचायतीत गेली. 4 तास त्यांनी तपास केला. त्यांच्या हाती अनिल परब यांचं 26 जून 2019चं पत्रं लागलं आहे. त्यातून सर्व काही उघड होणार आहे. त्यामुळे आता खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही, असं सोमय्या म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.