धक्कादायक! मामाचं भाच्यावर हे कसलं प्रेम? वाढदिवसानिमित्त दिलं असं गिफ्ट की पोलीसांनी…
नागपूर शहरात अशी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिसांनी थेट भाच्याच्या घरावर छापा टाकत गिफ्ट ताब्यात घेतलचं त्याचबरोबर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे.
नागपूर : कोणत्याही मामाचं आपल्या भाच्यावर जीवापाड प्रेम हे असतचं. मामा भाच्या भाचीवर आई-वडीलांप्रमाणेच प्रेम करत असतो. त्यांच्यासाठी खाऊ पासून वाढदिवसाच्या गिफ्टपर्यंत सगळं. मात्र एका गिफ्टमुळं कोणा भाच्यावर कधी गुन्हा दाखल झाला आहे का? तेही मामामुळं.
नागपूर शहरात अशी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिसांनी थेट भाच्याच्या घरावर छापा टाकत गिफ्टतर ताब्यात घेतलचं त्याचबरोबर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूर शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन भाच्याला त्याच्या मामाने वाढदिवसाला एक्क गिफ्ट दिलं. ज्यामुळे नागपुरात सध्या जोरदार चर्चा रंगली. मामा ब्रिजेशकुमार सेवकराम रत्ने याने त्याच्या भाच्याला वाढदिवसानिमित्त पिस्तुल भेट केलं. तो 17 वर्षीय भाचा यानंतर पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अल्पवयीन मुलाला अटक करत त्याला ताब्यात घेतलं. घरावर छापा टाकत पिस्तुल ताब्यात घेतल आहे. तर मामाला सह आरोपी करत त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.
