Aaditya Thackeray : ऑफर दिली म्हणून स्वागताला… फडणवीसांच्या ‘त्या’ ऑफरनंतर आदित्य ठाकरेंचं मिश्कील वक्तव्य अन्…
विधिमंडळात दानवेंच्या निरोप समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली. यावर आदित्य ठाकरेंनी मिश्किल वक्तव्य केलं.
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निरोप देण्याच्या समारंभाच्या वेळी विधिमंडळात टोलेबाजी आणि जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. दानवेंना शुभेच्छा देताना फडणवीस म्हणाले, २०२९ पर्यंत उद्धव जी तुम्हाला कोणताही स्कोप नाही. हवं तर तुम्हीच आमच्याकडे या…अशी थेट ऑफरच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना डिवचण्याची संधी सोडली नाही. तर दुसरीकडे त्याच दिवशी रात्री ठाकरे गटातील माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अचानक एका कार्यक्रमात आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा आदित्य यांनीही या ऑफरवर मिश्किल भाष्य केले. आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागताला उभा राहिलो तर देवेंद्र फडणवीस यावर हसत म्हणाले मी गंमत केली, थोडा लाईट मूड असला पाहिजे… चलू? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत मिश्कील संवाद साधला.
