पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील अपघाताचा फटका जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीला
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर(Pune-Mumbai Expressway) झालेल्या अपघाताचा (Accident) फटका जुना पुणे मुंबई महामार्गावर दिसून येत आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर(Pune-Mumbai Expressway) झालेल्या अपघाताचा (Accident) फटका जुना पुणे मुंबई महामार्गावर दिसून येत आहे. पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गवर जाणारी जड वाहतूक ही जुन्या मुंबई पुणे महामार्गावर (old Mumbai-Pune highway) वळविल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्मण झाले आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तळेगांव दभाडे टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्णय झाली आहे. द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत झालेल्या या अपघाताला आठ तास उलटून गेलेत. परंतु अद्यापही पुण्यावरुन मुंबईला जाणारी मार्गिका विस्कळीत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागणार आहे. अशी माहिती अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
Published on: Mar 26, 2022 01:54 PM
