Lucy Massey On Ganesh Naik | गणेश नाईकांना जामीन मिळाला तर आम्ही हाय कोर्टात दाद मागणार

| Updated on: Apr 29, 2022 | 2:04 AM

या दोन्ही गुन्ह्याबाबत ठाणे न्यायालयात आरोपी गणेश नाईक यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र अद्याप जामीन अर्जावर  सुनावणी केलेली नाही. गुरुवारी ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.के. ब्रम्हे यांनी गणेशनाईक प्रकरणात 30 एप्रिल रोजी सुनावणी करण्याचे आदेश दिले.

Follow us on

YouTube video player

ठाणे : अत्याचार आणि बंदुकीने धमकावल्या प्रकरणी नेरुळ आणि सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुरुवारी ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.के.  ब्रम्हे यांच्या न्यायालयात नाईक यांच्या अटक पूर्व जामिनावर सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा तारीख पे तारीख देत न्यायालयाने चौथ्यांदा सुनावणीची तारीख पुढे ढकलली. आता दोन्ही प्रकरणावर 30 एप्रिलला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सुनावणी होणार आहे. गणेश नाईक यांच्यावर पिडीतेने नेरुळ पोलीस ठाण्यात मनाच्या विरोधात संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करून अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तर सीबीडी पोलीस ठाण्यात बंदुकीने धमकावल्याचा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्याबाबत ठाणे न्यायालयात आरोपी गणेश नाईक यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र अद्याप जामीन अर्जावर  सुनावणी केलेली नाही. गुरुवारी ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.के. ब्रम्हे यांनी गणेशनाईक प्रकरणात 30 एप्रिल रोजी सुनावणी करण्याचे आदेश दिले.