Sanjay Shirsat : विवाहित महिलेची फसवणूक आणि शारीरिक छळ; संजय शिरसाटांच्या मुलावर गंभीर आरोप
Allegations On Sanjay Shirsat's Son : महायुतीतीत शिंदे सेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विवाहित महिलेची फसवणूक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्याच्या मुलावर करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री आणि सांभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेची फसवणूक केल्याचे हे गंभीर आरोप झालेले आहेत. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या की, हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधींकडूनच गुन्हेगारीला उत्तेजन मिळत असेल आणि लोकप्रतिनिधीच सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर गोरगरिबांच्या लेकीबळींवर अशा प्रकारे हात टाकत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. आता निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यायचा आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात जी तत्परता दाखवली होती, ती तत्परता आता संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्यात भाजप दाखवणार का? कारण कुठे ना कुठे आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.
