‘त्या’ पदासाठी लिंबूला टाचण्या… आदित्य ठाकरेंचा गोगावलेंवर निशाणा, रायगड पालकमंत्रिपदाच्या वादावरून जुंपली

‘त्या’ पदासाठी लिंबूला टाचण्या… आदित्य ठाकरेंचा गोगावलेंवर निशाणा, रायगड पालकमंत्रिपदाच्या वादावरून जुंपली

| Updated on: Aug 14, 2025 | 12:59 PM

अडीच वर्षांचं मंत्रिपद सोडलं त्याला पालकमंत्रिपद काय? असा सवाल करत शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवरून पलटवार केला आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्यात या पदावरून रस्सीखेच सुरू आहे. या वादाला १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे, त्यामुळे भरत गोगावले यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया देताना “सब्र का फल मिठा होता है” असे म्हटले आहे, तर तटकरे यांनी समन्वयाने काम करण्याची ग्वाही दिली आहे. दरम्यान, पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदित्य ठाकरेंनी भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘रायगड पालकमंत्रिपदाचा वाद स्वार्थासाठी आहे. मंत्री झाल्यावरही काहींचा स्वार्थीपणा सुरू आहे. तर पालकमंत्रिपदासाठी लिंबूला टाचण्या मारणं योग्य नाही’, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टोला लगावला.

Published on: Aug 14, 2025 12:45 PM