मुंबईकरांनो काळजी घ्या, मुंबईत ‘या’ भागातील प्रदुषणात झाली आणखी वाढ

| Updated on: Feb 01, 2023 | 9:48 AM

मुंबईतील वाढत्या प्रदुषणासह आणि बदलत्या हवामानामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका! श्वसनाचे आजार बळवण्याची भिती

Follow us on

मुंबई : दिल्ली, पुण्यानंतर आता मुंबईतील काही भागात प्रदूषण वाढले आहे. मुंबईतील वांद्रे, चेंबुर, कुर्ला आणि नवी मुंबईतील हवा ही जास्त प्रमाणात प्रदुषित असल्याची काल नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील हवा प्रदुषणात आणखी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवामानातील प्रदुषणाची पातळी ही खालावली आहे. जानेवारीतच मुंबईतील प्रदूषण पातळी वाढली होती आणि जानेवारीच्या अखेरीस ही हवा अति प्रदुषित असल्याची नोंद करण्यात आली होती. हवा प्रदूषणाची वाढती पातळी आणि समुद्र वाऱ्यांचा वेग मंदावल्याने प्रदूषण वाढत आहे. तर वाहतूक कोंडीमुळे देखील प्रदूषण पातळीत वाढ होतांना दिसत आहे. मुंबईतील या बदलत्य़ा हवामानामुळे मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याला धोका संभावत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार बळवण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.