Special Report | दहा वर्षानंतर सुरेश कलमाडी पुणे महापलिकेत; ओळखणं सुद्धा अवघड होईल अशी त्यांची स्थिती झालेय

| Updated on: Aug 05, 2022 | 11:31 PM

भारतीय वायुसेनेत पायलट, नंतर पुणे काँग्रेसचे अध्यक्ष, युथ काँग्रेसचे प्रमुख, सलग ३० वर्ष खासदार, रेल्वेमंत्री अशी अनेक पदं कलमाडींनी भूषवली. मात्र 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरली... आणि त्या स्पर्धेमुळे कलमाडींच्या राजकारणाचा खेळखंडोबा झाला. कलमाडींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले... आणि तेव्हापासून कलमाडींच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली.

Special Report | दहा वर्षानंतर सुरेश कलमाडी पुणे महापलिकेत; ओळखणं सुद्धा अवघड होईल अशी त्यांची स्थिती झालेय
Follow us on

मुंबई : सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी(Suresh Kalmadi )… अशी काही दशकांपूर्वी पुण्यात म्हटलं जायचं. पुण्यापासून पार्लमेंटपर्यंत कलमाडींचा दरारा होता. पण आज त्याच कलमाडींना ओळखणं सुद्धा अवघड होईल. अशी त्यांची स्थिती आहे. कलमाडी म्हणजे पुण्याचं राजकारण आणि पुण्याचं राजकारण म्हणजे कलमाडी अशी होती. एखादा वॉर्ड असो कि मग पुणे महापालिका कलमाडींच्या नावाशिवाय एकही बातमी व्हायची नाही. मात्र आज कलमाडी १० वर्षानंतर पुणे महापालिकेत आले( Pune Municipality) आणि त्याचीच बातमी झाली.  एका हातात काठी, आणि दुसऱ्या हातानं आधार घेत सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत पोहोचले. महापालिकेत कलमाडींनी पालिका आयुत्कांची भेट घेतली, आणि भविष्यात यापुढे महापालिकेत येत राहिन म्हणून माध्यमांना प्रतिक्रियाही दिली.

कधी-काळी पुणे महापालिकेवर कलमाडी गटाचं वर्चस्व असायचं. आज पुण्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. खासदारही नाहीय. पुण्याला लागून असलेल्या बारामतीत पवारांसारखे नेते असूनही कलमाडींचं पुण्यात वर्चस्व होतं. मात्र आज त्याच पुणे महापालिकेत काँग्रेसचे जेम-तेम 9 ते 10 नगरसेवक राहिले आहेत.

भारतीय वायुसेनेत पायलट, नंतर पुणे काँग्रेसचे अध्यक्ष, युथ काँग्रेसचे प्रमुख, सलग ३० वर्ष खासदार, रेल्वेमंत्री अशी अनेक
पदं कलमाडींनी भूषवली. मात्र 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरली… आणि त्या स्पर्धेमुळे कलमाडींच्या राजकारणाचा खेळखंडोबा झाला.
कलमाडींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले… आणि तेव्हापासून कलमाडींच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली.

एका व्यक्तीमुळे कोणतीच पक्ष संघटना लयाला जात नाही, हे खरं असलं. तरी कलमाडींनंतर पुण्यातली काँग्रेस पुन्हा उभी राहू शकली नाही., हे वास्तव आहे. आज भाजप आणि राष्ट्रवादी हे पुण्यातले मोठे पक्ष झाले आहेत. कधीकाळी एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या पुणे महापालिकेत काँग्रेस आज चौथ्या स्थानावर आहे..