पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का, ‘या’ गोष्टींचाही हक्क सोडावा लागणार ?

पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का, ‘या’ गोष्टींचाही हक्क सोडावा लागणार ?

| Updated on: Feb 18, 2023 | 7:39 PM

निवडणूक आयोगाच्या निकालाचे दूरगामी परिणाम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर होणार आहेत. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शिवसेना पक्षाच्या नावावर असलेला १५० कोटींचा निधी कुणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर टीका केली. तर, शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकालाचे दूरगामी परिणाम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर होणार आहेत. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शिवसेना पक्षाच्या नावावर असलेला १५० कोटींचा निधी कुणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच, मंत्रालयासमोर असेलेले शिवालय, पालिकेतील पक्ष कार्यालय आणि विधानभवन येथील पक्ष कार्यालय कुणाकडे जाणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याबाबत दोन्ही बाजूनी जोरदार दावे, प्रतिदावे केले जात आहेत.

Published on: Feb 18, 2023 07:39 PM