‘तकलादू अर्थसंकल्पाचा निषेध करतो’, असे म्हणत अमोल मिटकरी यांची शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

| Updated on: Mar 09, 2023 | 8:15 PM

VIDEO | अर्थसंकल्पावरून अमोल मिटकरी यांची शिंदे-फडणवीस सरकारवर जहरी टीका, बघा कोणते केले सवाल

Follow us on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात फक्त घोषणा केल्या असून आभासी हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करत असतांना तुकाराम महाराज यांचे नाव घेण्यात आले. त्यांच्या देहुत आज कुठलाही निधी जाहीर करण्यात आला नाही. महापुरुषांच्या नावाने त्यांच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला होता. त्यावरून कुठेही उच्चार काढला नाही. असे म्हणत अर्थसंकल्पात संताची नावं कशासाठी घेतली? असा प्रश्नही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांवर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे. त्यापार्श्वभूमीवर कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नाही असे अमोल मिटकरी यांनी म्हणत संताचे नाव घेऊन फक्त राजकारण केले जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. बघा आणखी कोणत्या मुद्द्यावर सरकारवर केली टीका…