नागपूरात ऑनलाईन परीक्षसाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

| Updated on: Jan 31, 2022 | 4:08 PM

नागपूरमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी मागणी करुन विद्यार्थ्यांनी मेडिकल चौकात आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम ऑनलाईन झाला असल्याने परीक्षाही ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Follow us on

नागपूरमध्ये (Nagpur) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा (Exam) रद्द करा किंवा परीक्षा ऑनलाईन (Online) घ्या अशी मागणी करुन विद्यार्थ्यांनी मेडिकल चौकात आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम ऑनलाईन झाला असल्याने परीक्षाही ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला नेतृत्व नसले तरी नागपूरमधील मेडिकल चौकात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी नागपूरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने पोलीसही मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले होते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने झाल्याने परीक्षाही ऑनलाईन घ्या किंवी परीक्षा तर रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यभरातील विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन तर घ्या किंवी परी रद्द करण्याच्या मागणी वर मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत.