टोपी घाला आम्हाला आता…, अजित दादा असं का म्हणाले?

| Updated on: Jan 19, 2023 | 2:43 PM

बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली. हे प्रदर्शन आजपासून शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांची हजेरी

Follow us on

बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली. हे प्रदर्शन आजपासून शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

प्रात्याक्षिकांवर आधारित असलेल्या कृषी प्रदर्शानाला हजेरी लावत अजित पवार यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पिक प्रात्याक्षिकांची माहिती देखील घेतली. यावेळी कृषी प्रदर्शन पाहताना टोपी विक्रेत्यांनी अजितदादा पवार यांना टोपी घालण्यासाठी आग्रह केल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा एका टोपी विक्रेत्याने अजित पवारांच्या डोक्यावर टोपी घातली. यानंतर टोपी घाला आता आम्हाला, असे मिश्कील भाष्य करत त्यांनी प्रतिक्रिया दिली. बारामतीतील १७० एकर या जागेत कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, भाजीपाला प्रक्रिया उद्योग असे अनेक उपक्रम पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.