Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा थरारक VIDEO समोर, दृश्य बघताच म्हणाल…
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं हे विमान लांडनला जात होते. या विमानाच्या टेकऑफवेळी हा मोठा अपघात झाला. २४२ प्रवासी विमानात असल्याची माहिती असून एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. तर या अपघातात जे गंभीर जखमी किंवा दुखापतग्रस्त आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. उड्डाणानंतर अवघ्या १0 मिनिटातच विमान कोसळल्याची माहिती मिळतेय. ज्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमानाने टेकऑफ केले आणि नंतर तब्बल ६२५ फूट उंचीवर पोहोचले असतानाच काही क्षणातच हे विमान खाली कोसळले. एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळतानाचे थरारक दृश्य आता समोर समोर आले आहे. जे पाहता क्षणी तुमच्या काळजाचा ठोका नक्की चुकेल…
अपघातानंतर DGCA कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं. तेव्हा ते क्रॅश झालं. कॅप्टन सुमीत सबरवालांना ८ हजार २०० तास विमान चालवण्याचा अनुभव होता. अहमदाबाद रनवे नंबर २३ वरून १.२३ वाजता विमानानं टेकऑफ केल्याची माहिती मिळतेय.
Published on: Jun 12, 2025 03:27 PM
