Ajit Pawar NCP : अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार? महत्त्वाची अपडेट समोर!

Ajit Pawar NCP : अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार? महत्त्वाची अपडेट समोर!

| Updated on: Dec 17, 2025 | 5:04 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अजित पवार गट नवाब मलिक यांच्याऐवजी सना मलिक यांच्या नेतृत्वात लढण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. सना मलिक यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय घडामोड समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गट नवाब मलिक यांच्याऐवजी सना मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचा विचार करत आहे. सना मलिक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यापूर्वी अजित पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुका नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे म्हटले होते. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांची युती होत असल्याने, नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यात सहभागी होऊ शकत नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सना मलिक यांना निवडणुकीचे नेतृत्व देण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे, औरंगाबाद खंडपीठाने संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला आहे. कराडच्या जामिनावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली, त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

Published on: Dec 17, 2025 05:04 PM