लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्…; विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी

लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्…; विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी

| Updated on: Jan 28, 2026 | 9:43 AM

अजित पवार यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान झालेल्या विमान अपघाताबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातात ४-५ जणांना दुखापत झाली आहे. लँडिंगच्या वेळी बिघाड झाल्याने हा अपघात झाला असून, प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीची गरज त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे लँडिंग करत असताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. बारामतीत त्यांच्या चार जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. बारामती विमानतळाजवळच हे विमान एका शेतात कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या अपघातात अजित पवार देखील गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात विमानातील अजित पवारांच्या सोबत असलेले सर्वजण गंभीर जखमी झाल्याचे कळते. जखमींमध्ये नेमके कोण कोण आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही घटनास्थळी पोलीस प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते आणि मदत पथके तातडीने पोहोचली आहेत. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजित शिवतारे यांनी देखील या घटनेची माहिती दिली आहे. या अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्रशासन या घटनेबद्दल लवकरच अधिकृत माहिती देईल अशी अपेक्षा आहे.

Published on: Jan 28, 2026 09:43 AM