Navnath Ban | अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद; नवनाथ बन यांचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

Navnath Ban | अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद; नवनाथ बन यांचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

| Updated on: Jan 30, 2026 | 1:56 PM

अजित पवार गेली अडीच वर्ष भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा सख्खा मित्र म्हणून अजित दादांचं नाव पुढे येत होतं, असं असतांना त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांची जाहिरात दिली तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायचं कारण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर भाजपने प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती देऊन दादांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन हे सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार गेली अडीच वर्ष भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा सख्खा मित्र म्हणून अजित दादांचं नाव पुढे येत होतं, असं असतांना त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांची जाहिरात दिली तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायचं कारण काय? असा प्रश्न बन यांनी उपस्थित केला आहे. मित्र पक्षाला कशाप्रकारे वागणूक द्यायची हे भाजपला माहीत आहे. संजय राऊत हे मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसतात, असा टोला बन यांनी राऊतांना लगावला आहे.

Published on: Jan 30, 2026 01:56 PM