Sanjay Shirsat : विरोधकांनी माझ्या खांद्यावर..; सिद्धांत शिरसाटांवर आरोप करणाऱ्या महिलेचं मोठं विधान

Sanjay Shirsat : विरोधकांनी माझ्या खांद्यावर..; सिद्धांत शिरसाटांवर आरोप करणाऱ्या महिलेचं मोठं विधान

| Updated on: May 27, 2025 | 4:44 PM

Allegations on Sidhant Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर झालेल्या गंभीर आरोपानंतर पीडित महिलेने याबद्दल मोठं विधान केलं आहे.

कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप झालेले होते. विवाहित महिलेची फसवणूक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेला होता. त्यानंतर आता हा विषय कौटुंबिक आहे. प्रकरण आपल्याला पुढे वाढवायचं नाही, असं पीडित महिलेने म्हंटलेलं आहे. विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं पीडितेचं म्हणण आहे.

महायुतीमधल्या शिवसेना शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेच्या शारीरिक आणि मानसिक छळ आणि फसवणुक प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या पीडित महिलेने टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हंटलं आहे की, हा विषय कौटुंबिक आहे. विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली. प्रकरण मला पुढे वाढवायचं नाही. सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटिस देखील मागे घेणार असल्याचं देखील पीडित महिलेने म्हंटलं आहे.

Published on: May 27, 2025 04:44 PM