Phaltan Doctor Death  : महिला डॉक्टरला फोन केला अन्… दानवेंचे भाजप माजी खासदारावर खळबळजनक आरोप

Phaltan Doctor Death : महिला डॉक्टरला फोन केला अन्… दानवेंचे भाजप माजी खासदारावर खळबळजनक आरोप

| Updated on: Oct 27, 2025 | 1:24 PM

अंबादास दानवेंनी भाजपच्या एका माजी खासदाराच्या PA वर महिला डॉक्टर संपदा मुंडे यांना फोन करून कामात हस्तक्षेप आणि दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या या वर्तनामुळे डॉक्टरने जीव गमावल्याचे दानवे म्हणाले. त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली असून, सत्तेचा माज स्पष्ट दिसतोय असे म्हटले.

अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या स्वीय सहाय्यकांवर (PA) गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, निंबाळकर यांचे PA राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांना फोन करून वैद्यकीय प्रमाणपत्र (फिट/अनफिट) देण्यासंदर्भात दबाव आणला होता.

अंबादास दानवे यांनी सांगितले की, 19 जून 2025 रोजी डॉक्टर मुंडे यांनी पोलिसांना अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत पत्र लिहिले होते, त्यानंतर 13 ऑगस्ट 2025 रोजी माहितीच्या अधिकारात कारवाई विचारली. या प्रकरणी पोलीस आणि राजकीय नेत्यांकडून झालेल्या दबावामुळेच डॉक्टर मुंडे यांनी कथितरित्या जीव गमावला, असा आरोप दानवेंनी केला. त्यांनी पोलीस अधिकारी अनिल महाडिक यांच्या बेमुर्वतखोरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. दानवेंनी याला “सत्तेचा माज” म्हटले आहे.

Published on: Oct 25, 2025 01:53 PM