Ambadas Danve: त्यानंतर मी कधीच.., आईचा मार का खाल्ला? अंबादास दानवे यांनी सांगितला खास किस्सा

Ambadas Danve: त्यानंतर मी कधीच.., आईचा मार का खाल्ला? अंबादास दानवे यांनी सांगितला खास किस्सा

| Updated on: Jul 16, 2025 | 5:55 PM

Ambadas Danve News : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपला आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे. शेवटच्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी आज विधी मंडळात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपत असल्याने निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सभागृहात सत्ताधारी पक्षासह मविआच्या नेत्यानी आपल्या भावना व्यक्त करत दानवेंच्या कार्यकाळाचं कौतुक केलं. दानवे हे ऑगस्ट 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. यावेळी आपल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलता अंबादास दानवे यांनी आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला.

दानवे म्हणाले की, मी लहान असताना विट्टी-दांडू खेळताना एका मुलाने मला मारलं होतं. मार खाल्यावर मी रडत घरी आलो आणि माझ्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यावर आईने मला अजून मारलं. मी तिला विचारलं का मारलं? तर म्हणाली की तू मार खाऊन घरी कसा आला? तिने असं म्हंटल्यावर मी त्या मुलाला जाऊन दुप्पट मारून आलो. मी त्यानंतर आजही कोणाचा मार खाल्लेला नाही. येणाऱ्या काळात देखील कधीच मार खाऊन घरी जाणार नाही, तर मारूनच घरी जाईल, असं यावेळी अंबादास दानवे यांनी म्हंटलं.

Published on: Jul 16, 2025 05:55 PM