Donald Trump On Pahalgam Attack : ‘तो हल्ला भयानक, पण मला खात्री…’, पहलगाम हल्ल्यावर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

Donald Trump On Pahalgam Attack : ‘तो हल्ला भयानक, पण मला खात्री…’, पहलगाम हल्ल्यावर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 26, 2025 | 5:58 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाममधील हल्ल्यावर माध्यमांशी संवाद साधला. या घटनेला अमानुष ठरवत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. काश्मीरवरून दोन्ही देशांत नेहमीच वाद होत आले आहेत. मात्र यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशाही ट्रम्प यांनी व्यक्त केली.

पहलगाम येथे 25 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. असे असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर बोलताना घटनेचा निषेध केला आहे. एअरफोर्स वन विमानात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या घटनेचे वर्णन अतिशय भयानक हल्ला असे केले. ते म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरमध्ये जे घडले ते अत्यंत निंदनीय आणि अमानवीय आहे. तुम्हाला माहिती आहेच की, मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या खूप जवळ आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये वर्षानुवर्षे युद्ध सुरू आहे. पण पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला खूप वाईट होता’, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये जे घडले ते अत्यंत निंदनीय आणि अमानवीय असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर या विषयावर संवाद साधला आणि भारतासोबत उभे राहण्याबाबतही बोलले होते. या अमानुष हल्ल्यातील दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी भारताला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Published on: Apr 26, 2025 05:58 PM