मोठी बातमी! महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर अमित शाह-फडणवीसांमध्ये चर्चा

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर अमित शाह-फडणवीसांमध्ये चर्चा

| Updated on: Jul 08, 2026 | 1:10 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर या संवादात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पूरग्रस्त भागांतील परिस्थिती, जनजीवनावर झालेला परिणाम तसेच बचाव आणि मदतकार्याचा आढावा या चर्चेत घेण्यात आला. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. “महाराष्ट्राला या पूरस्थितीत जी काही मदत आवश्यक असेल, ती केंद्र सरकारकडून तातडीने उपलब्ध करून दिली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आहे.

राज्य आणि केंद्र सरकार सतत संपर्कात असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत आणि बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी समन्वयाने काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Published on: Jul 08, 2026 1:10 PM
Follow Us