Amit Thackeray : त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Amit Thackeray : त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत

| Updated on: May 08, 2025 | 1:02 PM

MNS Leader Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपले वडील राज ठाकरेंचा सल्ला न ऐकल्याची खंत एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे.

आज मला एवढं वाईट वाटत आहे की माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता तो ऐकायला हवा होता, अशी खंत मनसेचे अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे. जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि ‘बोलक्या रेषा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यंगचित्र स्पर्धा 2025 व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अमित ठाकरेंनी ही खंत व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, या कार्यक्रमाला यावर्षी प्रत्यक्ष सहभागी होता आलं, याचा मला अत्यंत आनंद आहे. गेल्या दोन वर्षांपासून घनश्याम देशमुख सरांनी निमंत्रण दिलं होतं, परंतु व्यस्ततेमुळे येता आलं नव्हतं. माझे अनेक मित्र आहे जे ड्रॉईंग शिकले, व्यंगचित्र शिकायचा प्रयत्न देखील केला पण त्यांना एक साधी रेषा देखील काढता येत नाही. आज मला एवढं वाईट वाटत आहे की माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता तो जर मी ऐकला असता तर आज माझं देखील एक व्यंगचित्र इथं दिसलं असतं. काहीही कर पण दिवसातून एकदा चित्र काढत जा, दिवसातून एक तास तरी व्यंगचित्र कलेला दे, असं मला त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी मी त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता, अशी खंत अमित ठाकरेंनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे.

Published on: May 08, 2025 01:02 PM