Amol Kolhe Video : ‘…माझ्यावर दबाव होता’, अमोल कोल्हे यांचा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेबाबत मोठा दावा
छावा चित्रपटासोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या मालिकेबाबत आता कोल्हेंनी खुलासा केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला ‘छावा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अशातच छोट्या पडद्यावरील मराठी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ यांची देखील चर्चा सुरू झाली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा शेवट गुंढाळण्यात आला अशी चर्चा सुरू असताना या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती, त्यांनीच मोठा खुलासा केला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट तसा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता”, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केलाय. ‘छावा’ या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या छळ होत असल्याचा एक सीन दाखवण्यात आला आहे. मात्र मालिकेत तो सीन दाखण्यात आला नव्हता. यावर बोलताना अमोल कोल्हेंनी “माझ्यावर माध्यमांचा दबाव होता”, असा खुलासा केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, असे म्हणत असताना आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले, अशी खंतही अमोल कोल्हेंनी यावेळी व्यक्त केली.
