बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा…, रवी राणांचा हल्लाबोल काय?

| Updated on: Apr 24, 2024 | 2:18 PM

रवी राणा यांनी बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमी प्रयत्न असतो. ज्या थाळीमध्ये खातो त्याच थाळीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करतात, असा आरोप देखील रवी राणा यांनी केला आहे.

बच्चू कडू आणि दिनेश बुब यांना रवी राणा यांचा खोट्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न होता, असा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. यावर रवी राणा यांनी बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमी प्रयत्न असतो. ज्या थाळीमध्ये खातो त्याच थाळीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करतात, असा आरोप देखील रवी राणा यांनी केला आहे. तर देशाच्या गृहमंत्र्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं दिला होता. बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय. तुम्ही जनतेच्या दरबारात लढावं लोकं अशी नौटंकी करून तुम्हाला वोट करणार नाही, असा टोलाही राणांनी लगावला. बघा व्हिडीओ काय म्हणाले रवी राणा?

Published on: Apr 24, 2024 02:18 PM