Lavish Ambani Wedding : सर्वात महागडं लग्न, लोकल टू ग्लोबल विवाह सोहळ्याची वर्षभरानंतरही चर्चा, कारण…
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यामुळे भारतीय विवाह पद्धतीला जगाच्या नकाशावर वेगळ स्थान मिळून देण्यात आलं. आर्थिक तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये भारत जेव्हा आपली ओळख निर्माण करत होता त्याच वेळेला या भव्य विवाह सोहळ्याने भारत हा आध्यात्मिक विश्वाची राजधानी आहे हे देखील दाखवून दिलं.
भारतीय विवाह पद्धतीला जगाच्या नकाशावर वेगळं स्थान मिळवून देणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. देशातूनच नाही तर जगभरातील बड्या व्यक्तींनी या लग्नाला हजेरी लावली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै २०२४ रोजी मुंबईत Jio World सेंटर मध्ये पार पडला होता. हा सोहळा केवळ एक लग्न नव्हतं तर एक सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव होता, ज्याने जगभराचं लक्ष वेधलं. अंबानी कुटुंबानं अतिथी देवो भव: या तत्त्वानुसार पाहुण्यांच भव्य स्वागत केलं.
पंतप्रधान मोदींपासून अनेक बडे राजकीय नेते, प्रसिद्ध कलाकार, खेळाडू, उद्योजकांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची यादी हेच दाखवते की भारताचं आंतरराष्ट्रीय आकर्षण किती वाढलेलं आहे. आर्थिक तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात भारत जेव्हा आपली ओळख निर्माण करत होता त्याच वेळेला या भव्य विवाह सोहळ्याने भारत हा आध्यात्मिक विश्वाची राजधानी आहे हे देखील दाखवून दिलंय. या लग्नात विविध वैदिक हिंदू परंपरांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक गुरूंचा एक उल्लेखनीय मेळावा होता. या विवाह सोहळ्याने जगाची आध्यात्मिक राजधानी म्हणून भारताची प्रतिमा आणखी उजळवली. अंबानी कुटुंबानं या लग्नात भारतीय परंपरांचा सुंदर संगम दाखवला.
