तर मी संन्यास घेईन…अजित पवार यांच्या ‘त्या’ आव्हानावर अंजली दमानियांचं थेट उत्तर

तर मी संन्यास घेईन…अजित पवार यांच्या ‘त्या’ आव्हानावर अंजली दमानियांचं थेट उत्तर

| Updated on: May 30, 2024 | 4:23 PM

पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणावरुन अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी होत आहे. आरोपीला मदत केल्याच्या आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. यानंतर अजित पवारांनी यावर उत्तर देत असे म्हटले की....

पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणावरुन राज्यातील राजकारण वेगळ्याच वळणावर पोहोचलं आहे. अशातच अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी होत आहे. आरोपीला मदत केल्याच्या आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. यानंतर अजित पवारांनी यावर उत्तर देत असे म्हटले की, ‘माझी नार्को टेस्टची तयारी आहे. त्या चाचणीत काही आढळले नाही तर अंजली दमानिया यांनी पुन्हा कुठे पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा’ तर अजित पवार यांनी अंजली दमानिया यांनी दिलेल्या आव्हानावर त्यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. अंजिल दमानिया यांनी अजित पवार यांना तुम्ही नार्को टेस्ट लवकरात लवकर करा, असे म्हटले आहे. मी तुमचे आव्हान स्वीकारत आहे. त्यात तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार, हे सांगा. तुम्ही दोषी आढळले नाही तर तुमच्या मागणीप्रमाणे मी घरी बसून राहील. कोणतेही सामाजिक काम करणार नाही. संन्यास घेईल. परंतु तुमची जी नार्को टेस्ट होईल, त्याची प्रश्नावली मी देणार आहे.

Published on: May 30, 2024 04:23 PM