Anjali Damania : ‘हे माननीय .. ‘, दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video

Anjali Damania : ‘हे माननीय .. ‘, दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video

| Updated on: Mar 07, 2025 | 5:53 PM

Satish Bhosale Viral Video : आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि बीडच्या शिरूरमधील मारहाण प्रकरणातला आरोपी सतीश भोसले याचा पैसे उधळतानाचा आणखी एक व्हिडिओ अंजली समानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात झालेल्या मारहाणीतील आरोपी सतीश भोसले याचा आणखी एक पैसे उधळतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केला आहे. कोणाचा अन्याय सहन करायचा नाही, असं या व्हिडिओमध्ये सतीश भोसले म्हणतो आहे.

सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि बीड येथे झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणातला आरोपी देखील आहे. अंजली दमानिया यांनी यापूर्वी काल देखील सतीश भोसलेचा असाच एक पैसे फेकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आज देखील दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून सतीश भोसलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सोफ्यावर बसून सतीश भोसले हा पैसे फेकत आहे आणि कोणाचा अन्याय सहन करायचा नाही, असं म्हणतो आहे. हरिण पकडण्याच्या जाळ्यावरून भोसले याने ढाकणे पिता – पुत्राला मारहाण केली होती. भोसले याच्या शोधासाठी सध्या पोलिसांची सहा पथकं रवाना झाली आहे.

Published on: Mar 07, 2025 05:52 PM