Aryan Khan Arrest | क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला 1 दिवसाची NCB कोठडी

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 8:39 PM

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता उर्वरित पाच आरोपींना पोलीस कोर्टात कधी हजर करतात हे पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ वकील सतीश माने-शिंदे यांनी कोर्टात आरोपींची बाजू मांडली

एनसीबीने अरबाज खानसह त्याच्या साथीदार अरबाज मर्चंट आणि मुनमुन या आरोपींची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र किला कोर्टाने केवळ एक दिवसाची कोठडी मान्य केली आहे. त्यामुळे एनसीबीला आता चौकशीसाठी फक्त एक दिवस मिळाला आहे. एनसीबी एक दिवसाच्या कोठडीत काय तपास करते, त्या तपासातून एनसीबीच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या लिंक कुठपर्यंत जातात ते आता तपासातून समोर येईल.