Asaduddin Owaisi : ‘तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही’, ओवैसींचा पुन्हा एकदा पाकिस्तानला टोला
Asaduddin Owaisi On Pakistan After Pahalgam Attack : एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्यावरून काल पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधत टीका केली आहे.
आमचा देशाच्या लष्कराचे जेवढे बजेट आहे तेवढे तुमच्या देशाचे आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत, असं एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तान विषयी बोलताना म्हंटलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलंच धारेवर धरलं आहे. देशाच्या प्रमुखांना मी मागणी करतो की त्यांनी पाकिस्तानची कोंडी करावी, अशीही मागणी यावेळी बोलताना ओवैसी यांनी केली आहे.
पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पाकिस्तान अर्धा तास नाही, तर 50 वर्ष आपल्या भारताच्या मागे आहे. तुमच्या देशाचं बजेट हे फक्त आमच्या लष्कराच्या बजेट एवढं आहे. तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही. कोणत्याही देशात जाऊन तुम्ही निष्पाप लोकांना माराल तर कोणीही गप्प बसणार नाही.
Published on: Apr 28, 2025 09:41 AM
