Team Indias Asia Cup Win: : “…हीच खरी ट्रॉफी”, पाकच्या मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडिआचा नकार

Team Indias Asia Cup Win: : “…हीच खरी ट्रॉफी”, पाकच्या मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडिआचा नकार

| Updated on: Sep 29, 2025 | 10:32 AM

आशिया चषकात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला. नक्वी पाकिस्तानचे गृहमंत्री असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

भारत आशिया चषकाचा विजेता ठरला आहे, पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत टीम इंडियाने हा किताब पटकावला. मात्र, या विजयानंतर दुबईत एक हायव्होल्टेज ड्रामा घडला. भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री असल्याने टीम इंडियाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. टीम इंडियाच्या या नकारानंतरही मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी मैदानावर वाट पाहत थांबले होते.

पण भारतीय खेळाडू त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अखेरीस नक्वी मैदानावरून ट्रॉफी घेऊनच बाहेर पडले. नकवी गेल्यानंतरच भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने “ड्रेसिंग रूममधील १४ खेळाडू हीच खरी ट्रॉफी” असल्याचे म्हटले. तसेच, त्याने मॅच फी भारतीय सैन्याला देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनीही ऑपरेशन सिंदूर असे ट्विट करत संघाचे अभिनंदन केले.

Published on: Sep 29, 2025 10:32 AM