अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा… काय घडलं?; नांदेड हादरलं
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात असताना प्रभाग 1 मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात असताना प्रभाग 1 मधील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘अशा प्रकारचं राजकारण जर घडत असेल तर त्याचा निषेध करतो’ असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. या प्रकरणावर लवकरच कारवाई करण्यात यावी आणि निवडणूक होईपर्यंत भालेराव कुटुंबाला संरक्षण मिळावं, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
Published on: Jan 14, 2026 12:49 PM
