Attari Border : भारत – पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले

Attari Border : भारत – पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले

| Updated on: May 02, 2025 | 12:43 PM

India Pakistan border news : पाकिस्तानच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आज पुन्हा एकदा अटारी सीमेवर दोन्ही बाजूचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.

अटारी सीमा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. भारत – पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डरचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमृतसर येथील अटारी सीमेवर पाकिस्तानने त्यांच्या स्थलांतरणाचे दरवाजे काल आडमुठी भूमिका घेत पूर्णपणे बंद ठेवलेले होते. आज पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांनी अटारी सीमेवर पाकिस्तानात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भारतीय सैन्याकडू पुन्हा पाकिस्तानी स्थलांतरण अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Published on: May 02, 2025 12:43 PM