Video : औरंगाबादच्या लेबर कॉलनीतील बेघरांना घर मिळेल- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

| Updated on: May 13, 2022 | 2:27 PM

शहरातील विश्वास नगर लेबर कॉलनी (Labor colony) परिसरात बुधवारी जिल्हा प्रशासनातर्फे 65 वर्षांपूर्वीची जीर्ण घरं पाडण्यात आली. येथील 338 घरं जेबीबीच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आली. मात्र ही कारवाई करत असताना या भागातील रंगीन दरवाजाशेजारील (Rangeen Gate) 368 वर्षे जुनी ऐतिहासिक तटबंदीही बाधित झाली. जेसीबीने कारवाई सुरु असताना या तटबंदीलाही भगदाड पडले. सुमारे 3 लाख चौरस फूट लांब, […]

Follow us on

शहरातील विश्वास नगर लेबर कॉलनी (Labor colony) परिसरात बुधवारी जिल्हा प्रशासनातर्फे 65 वर्षांपूर्वीची जीर्ण घरं पाडण्यात आली. येथील 338 घरं जेबीबीच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आली. मात्र ही कारवाई करत असताना या भागातील रंगीन दरवाजाशेजारील (Rangeen Gate) 368 वर्षे जुनी ऐतिहासिक तटबंदीही बाधित झाली. जेसीबीने कारवाई सुरु असताना या तटबंदीलाही भगदाड पडले. सुमारे 3 लाख चौरस फूट लांब, दीड फूट रुंद आणि 11 ते 20 फूट उंच अशी ही तटबंदी शहराचा ऐतिहासिक (Historical) ठेवा होता. त्यालाचा प्रशासानच्या कारवाईत धक्का लागल्याने इतिहासप्रेमींचा संताप झाला आहे. गुरुवारी शहरातील ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ रफत कुरेशी आजारी असतानाही त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी येथील पाडापाडीवर आक्षेप घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचवला. त्यानंतर इतिहास प्रेमी औरंगाबादकरांकडून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बेघरांना घर मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.