Balasaheb Thorat | मुंबई लोकलला रक्तवाहिन्या म्हणतात, मात्र त्याच अपुऱ्या पडतायत : बाळासाहेत थोरात
लोकल आणि वाहतुकीला काय मदत करता येईल याबाबत विचार करण्यात आला. फ्री वे ला विलासराव यांचं नाव देण्याबाबत विधानसभेत चर्चा झाली होती. (Balasaheb Thorat said, Mumbai locals are called blood vessels, but it is not enough)
मुंबई : मुंबईचे स्थान हे महत्वाचे आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर देशात महत्वाचं आहे. येथील दळणवळण महत्वाचं आहे. येथील लोकलला रक्तवाहिन्या म्हणतात; पण त्या ही अपुऱ्या पडायला सुरुवात झाली आहे. लोकल आणि वाहतुकीला काय मदत करता येईल याबाबत विचार करण्यात आला. फ्री वे ला विलासराव यांचं नाव देण्याबाबत विधानसभेत चर्चा झाली होती. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक झालं. वेळ लागेल पण सुरुवात करत आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मेट्रो उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात म्हटले आहे.
