Infiltration at LOC Baramulla : पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न

Infiltration at LOC Baramulla : पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न

| Updated on: Apr 23, 2025 | 10:27 AM

Pahalgam Terror Attack Updates : जम्मू काश्मीर दहशतवाद्यांच्या हल्ल्याने अद्याप सावरलेलं नसताना आता बारामुल्ला भागात पुन्हा एकदा दहशतवादी हालचाली दिसून आल्या आहे.

जम्मू – काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. यानंतर लष्कराच्या जवानांकडून गोळीबार सुरू करण्यात आलेला आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये काल दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत हल्ला केला होता. त्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आज बारामुल्ला येथे देखील दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने गोळीबार करून हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

Published on: Apr 23, 2025 10:27 AM