India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी बंद, कारण…

India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी बंद, कारण…

| Updated on: May 09, 2025 | 2:33 PM

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओजेके) मधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर बीएसएफचा हा निर्णय आला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने, सीमा सुरक्षा दलाने (BSF) पंजाबमधील पाकिस्तानला लागून असलेल्या तीन सीमा चौक्या – अटारी, वाघा, हुसेनवाला आणि सादकी येथे होणारा बीटिंग रिट्रीट सोहळा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे. दरम्यान, बीएसएफकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात असे म्हटले की, दररोज सूर्यास्ताच्या वेळी राष्ट्रध्वज उतरवण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. पण सीमेवरचं बिटिंग द रिट्रीट सोहळा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताकडून बुधवारी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्याशी संबंधित नऊ प्रमुख दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. यापैकी चार लक्ष्ये पाकिस्तानच्या आत होती आणि उर्वरित पाच पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये होती.

Published on: May 09, 2025 02:33 PM