Beed Crime : विकास बनसोडेचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे

Beed Crime : विकास बनसोडेचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे

| Updated on: Mar 19, 2025 | 2:01 PM

Vikas Bansode Case : बीडच्या विकास बनसोडेचा मृत्यू हा मारहाणीमुळेच झाला असल्याचं आता उघड झालं आहे. विकासचे शवविच्छेदन अहवाल समोर आले असून त्यातून धक्कादायक खुलासे झाले आहेत.

मारहाणीत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे विकास बनसोडे याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. 15 मार्च रोजी बीडच्या आष्टी तालुक्यातून हा सर्व प्रकार समोर आला होता. विकास बनसोडे आणि त्याच्या मित्राला बांधून ठेवत 2 दिवस अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात टाकून आरोपी निघून गेले होते. यावेळी त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. अंजली दमानिया यांनी देखील ही संतोष देशमुख हत्येची पुनररावृत्ती असल्याचं म्हंटलं होतं त्यानंतर आज मृत विकास बनसोडे याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यातून त्याचा मृत्यू हा मारहाणीत झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळेच झाला असल्याच स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी आत्तापर्यन्त पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे.

Published on: Mar 19, 2025 02:01 PM