Santosh Deshmukh Case : ‘वाल्मिक आण्णा तुला जीवंत सोडणार नाही’, अशी झाली देशमुखांची हत्या, बघा आरोपपत्रातील A टू Z घटनाक्रम

Santosh Deshmukh Case : ‘वाल्मिक आण्णा तुला जीवंत सोडणार नाही’, अशी झाली देशमुखांची हत्या, बघा आरोपपत्रातील A टू Z घटनाक्रम

| Updated on: Mar 01, 2025 | 4:41 PM

सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे देशमुखांची हत्या झाल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे.

सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे देशमुखांची हत्या झाल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे.

बघा आरोपपत्रातील A टू Z घटनाक्रम

८ ऑक्टोबर २०२४ ला अवधा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेना कराडने परळीच्या कार्यालयात बोलावले. कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी द्या अन्यथा अवादा कंपनी बीड जिल्ह्यातली कामे बंद करा, अशी धमकी कराडने विष्णू चाटेच्या समोर दिली.

२९ नोव्हेंबर २०२४ ला कराडने चाटेच्या फोनवरून अवादा कंपनीच्या सुनील शिंदेना काम बंद करण्याची पुन्हा धमकी दिली. त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कंपनीमध्ये जाऊन धमकी दिली.

२९ नोव्हेंबरला कराड, चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी कल्याच्या कार्यालयात बैठक घेतली आणि हत्येचा कट रचला.

६ डिसेंबर २०२४ ला घुले आणि सांगळेने कंपनीत जाऊन सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. यावेळी दोन कोटी द्या नाहीतर काम बंद करण्याची धमकी देण्यात आली.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मस्साजोगसे सरपंच देशमुखांना फोन केला. देशमुखांनी घुलेला कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली.

सुदर्शन घुलेने त्यावेळी देशमुखांना सरपंच तुला बघून घेऊ, जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर विष्णू चाटेने देशमुखांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिक आण्णा तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता.

७ डिसेंबर २०२४ ला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला. कराडने घुलेला सांगितले, जो तो उठेल आपल्या आड येईल, आपण भिकेला लागू, कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. आता जो कुणी आड येईल त्याला अडवा करावा लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोला तो तुम्हाला मदत करेल.

८ डिसेंबर २०२४ ला चाटे, घुले आणि अन्य चांदूर फाट्याजवळच्या हॉटेल तिरंगा येथे भेटले. त्यावेळी घुलेने कराडचा निरोप दिला. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या, असा निर्णय दिला.

९ डिसेंबरला दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, सांगळे, आंधळे, जयराम चाटे आणि केदारने सरपंच देशमुखांची उमरी टोल नाक्याजवळ गाडी अडवून अपहरण केलं. त्यानंतर लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीचा वापर करून देशमुखांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला. संध्याकाळी ६.३० वाजता देशमुखांचा मृतदेह दैठाण फाट्याजवळ टाकून आरोपी पळून गेले.

पोलिसांनी आरोपपत्रामध्ये कराड हाच हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे पुरावे दिले आहेत. त्यामध्ये वाल्मिकच्या वारंवार खंडणीसाठी कंपनीला धमक्या आणि खंडणीच्या आड आल्याने सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये केल्याच्या पुराव्यांचा समावेश आहे.

कराडने देशमुखांच्या हत्येसाठी संघटीत टोळीचा आर्थिक फायद्यासाठी, टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी आणि जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केली हे पोलिसांनी आरोपपत्रामधून दाखवून दिले. तसेच या टोळीने गेल्या १० वर्षात ११ गुन्हे केले आहेत. त्यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्याचे आरोपपत्रामध्ये नमूद केले आले.

Published on: Mar 01, 2025 04:39 PM