मंत्रिमंडळ विस्तार होणार, पण रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेत वाद? भरत गोगावले स्पष्टचं बोलले…

| Updated on: Aug 02, 2023 | 3:00 PM

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालनंतर आता सर्वांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल आणि कोणाला त्यात स्थान मिळेल याची सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेनेतील काही नेत्यांनी तर मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेत वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow us on

नेरळ : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालनंतर आता सर्वांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल आणि कोणाला त्यात स्थान मिळेल याची सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेनेतील काही नेत्यांनी तर मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेत वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी एका भाषणा आपल्याकडे रायगडचे पालकमंत्री पद तात्पुरते असल्याचे वक्तव्य केलं होतं. यावर आता रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोगावले यांनी पालकमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. “आली संधी तर गोँधळ घालणारच आम्ही, त्यामुळे आम्ही वाट पाहतोय. उदय सामंत यांच्याकडे दोन पदं आहेत, त्यांना एक द्यावचं लागेल, जेव्हा मुख्यमंत्री अडचणीत दिसले तेव्हा आम्ही थोडं पाठीमागे थांबलो.आता आमची संधी, आम्ही ते घेऊ”, असे गोगावले म्हणाले.