Bhaskar Jadhav : राऊतांच्या ‘त्या’ विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहेर
Bhaskar Jadhav Vs Sanjay Raut : आमदार भास्कर जाधव यांनी आज प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांना घरचा आहेर दिला आहे.
पक्ष मला भाषण करायला देतो की नाही हे मला चांगलं कळतं. माझं भाषण झाल्यानंतर संजय राऊत यांचं भाषण झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून हे बोलतोय, असा त्यांच्या बोलण्यातून जो संदेश जातोय हे चुकीचं आहे,असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राऊतांच्या विधानावर दिलं आहे. माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. मला भाषण करायला मिळालंच पाहिजे. मी भाषण करणारा मोठ माणूस आहे, हे माझ्या डोक्यात नाही एवढंच मला सांगायचं आहे, असा घरचा आहेरच भास्कर जाधव यांनी संजय राऊतांना दिला आहे.
यावेळी बोलताना जाधव यांनी सांगितलं की, संजय राऊत हे माझे वरिष्ठ नेते आहेत. माझ्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतात. आपल्या नेत्याने एखादे विधान केले असेल तर आपण त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीने ते वरचे वर मला सावरण्याची भाषा करतात. पण मला वाटतं की मला भान आहे, असं स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
