Bhaskar Jadhav : बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही – भास्कर जाधव
Bhaskar Jadhav On Beed Crime Case : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सरकारने ठोस उपाययोजना करून बीडचा विषय आता संपवावा, असं म्हंटलं आहे.
सकाळ संध्याकाळ डिसेंबर महिन्यापासून बीड, बीड, बीड एवढंच विषय सुरू आहे. सरकार हा विषय संपवत का नाही, हेच कळत नाही आहे, असं मोठ विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. एखाद्या जिल्हयावर आणि तिथल्या राजकीय परिस्थितीवर सातत्याने असे काही आरोप होतात तेव्हा काही तरी ठोस उपाय सरकारने करायला हव्या. पण सरकार हा विषय संपवत का नाही आणि त्यांना यात काय रस आहे हे कळत नाही, असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे. लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी भास्कर जाधव यांनी काल विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे यांना बघून शिंदेंनी तोंड फिरवलं त्याबद्दल देखील टीका केली. राजकीय मतभेद असले म्हणजे वैयक्तिक दुश्मनी होत नाही. मात्र अजित पवार म्हणाले तसं शिंदेंच्या मनातून खुर्ची जात नसेल, आणि माझीही इच्छा आहे त्यांच्या मनातून खुर्ची जाऊ नये, असं जाधव यांनी म्हंटलं आहे.
