KDMC | कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
राज्यभरात महापालिका निवडणुका होऊन निकालही लागला, मात्र मुंबईसह सगळीकडे महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये महायुतीने एकत्र निवडणूक लढली होती. मात्र महापौर नक्की कोणाचा? अशी चर्चा सुरू असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे गटाचा महापौर होणार आहे. विशेष म्हणजे मनसेच्या पाठिंब्याने हा महापौर होणार असून कल्याणमध्ये मनसेला […]
राज्यभरात महापालिका निवडणुका होऊन निकालही लागला, मात्र मुंबईसह सगळीकडे महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये महायुतीने एकत्र निवडणूक लढली होती. मात्र महापौर नक्की कोणाचा? अशी चर्चा सुरू असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे गटाचा महापौर होणार आहे. विशेष म्हणजे मनसेच्या पाठिंब्याने हा महापौर होणार असून कल्याणमध्ये मनसेला उपमहापौरपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे सकाळीच कोकण भवनात आले होते. यावेळी त्यांनी महापौरपदाबाबतचा सस्पेन्स दूर केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 53 शिवसेनेचे नगरसेवकांनी कोकण भवन इथे आपला गट स्थापन केला आहे. त्याचबरोबर मनसेचे 5 नगरसेवक त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आले आहेत. या गटस्थापनेच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला समर्थन दिले आहे. मात्र युतीमध्येच कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करणार असं स्पष्ट वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
