Bihar Election Results: बिहारमध्ये NDA ची त्सुनामी अन् आघाडी 40 च्या आत… दारूण पराभवाचं खापर आयोगावर!

Bihar Election Results: बिहारमध्ये NDA ची त्सुनामी अन् आघाडी 40 च्या आत… दारूण पराभवाचं खापर आयोगावर!

| Updated on: Nov 15, 2025 | 10:50 AM

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने त्सुनामी विजय मिळवला, तर विरोधकांना दारूण पराभव पत्करावा लागला. आरजेडी सर्वात मोठा पक्ष होईल, हे भाकीत खोटे ठरले. काँग्रेसने पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडत महाराष्ट्रातील निकालांशी तुलना केली, तसेच व्होटचोरीच्या आरोपांना मतदारांनी महत्त्व दिले नाही हे स्पष्ट झाले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राप्रमाणेच विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. राजकीय पंडितांनी आरजेडी सर्वात मोठा पक्ष होईल, असे भाकीत केले होते, परंतु महाआघाडीला मिळून ४० जागाही मिळाल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ दिवसांपूर्वीच बिहारमध्ये मोठ्या विजयाचा दावा करत विजयोत्सवाची तयारी करण्याचे आवाहन केले होते, ते या निकालांमधून खरे ठरले. एनडीएची अक्षरशः त्सुनामी दिसली. मात्र, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी हा पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे.

काँग्रेसने निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश्वर कुमार बिहारच्या जनतेवर भारी पडल्याची टीका केली. हा निवडणूक आयोग विरुद्ध बिहारची जनता असा सामना असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात जे घडले, तेच बिहारमध्ये घडले असून जनतेने आपली लोकशाही निकोप आहे का, याचा विचार करावा, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. राहुल गांधी आणि महाआघाडीने व्होटचोरीवरून जोरदार प्रचार केला होता, परंतु बिहारच्या मतदारांनी या आरोपांना महत्त्व न देता एनडीएलाच पसंती दिली, असे आकडेवारीवरून दिसते.

Published on: Nov 15, 2025 10:50 AM