Bihar Mahila Rojgar Yojana : भाजपचा मास्टर स्ट्रोक, 75 लाख महिलांच्या खात्यात थेट 10 हजार जमा, ‘लाडकी बहीण’नंतर कोणत्या योजनेची चर्चा?

Bihar Mahila Rojgar Yojana : भाजपचा मास्टर स्ट्रोक, 75 लाख महिलांच्या खात्यात थेट 10 हजार जमा, ‘लाडकी बहीण’नंतर कोणत्या योजनेची चर्चा?

| Updated on: Sep 26, 2025 | 12:15 PM

बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी 75 लाख महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर भाजपने हा मास्टर स्ट्रोक खेळला असून, महिलांना रोजगारासाठी मदत करण्याचा उद्देश आहे.

बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर, महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, राज्यातील 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असे या योजनेचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. या योजनेच्या माध्यमातून महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर रोजगार निर्मितीसाठी मदत केली जाणार आहे.

विशेषतः हस्तकला, शिवणकाम, विणकाम यांसारख्या कामांसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये जशी विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, त्याच धर्तीवर बिहारमध्ये देखील निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे बिहारमधील महिलांना आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Published on: Sep 26, 2025 12:15 PM