Amit Shah : हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस… रायगड दौऱ्यावरील शाहांच्या ‘त्या’ कृतीची होतेय चर्चा

Amit Shah : हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस… रायगड दौऱ्यावरील शाहांच्या ‘त्या’ कृतीची होतेय चर्चा

| Updated on: Apr 18, 2025 | 3:37 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि शिवरायांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले होते.

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच 12 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेलेत. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी असल्याने अमित शाह यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता रायगडवर असताना अमित शाह यांनी केलेल्या एका कृतीची चांगलीच चर्चा होत आहे. अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात हातात घेऊन शिवरायांच्या समाधीस्थळी गेल्याची माहिती मिळतेय. तर एवढ्या गर्दीत अमित शाह फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच घेऊन गेल्याने भारतीय जनता वर्तुळात चांगलीच चर्चा होतेय. यासह कोणत्याही सुरक्षेविना अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवरायांच्या समाधीस्थळी गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी असल्याने रायगडावर एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील मुख्य कार्यक्रमानंतर अमित शाह अचानक भावनिक झाले आणि शिवरायांच्या स्मृतीस्थळावर अमित शाह पाच मिनिटं बसून राहिल्याची चर्चाही होताना दिसतेय.

Published on: Apr 18, 2025 03:37 PM